पॅन इंडिया अवेअरनेस अंतर्गत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे माहितीपर फलकाचे अनावरण

जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी केले सदर फलकाचे अनावरण

 

 

रत्नागिरी  : सिद्धेश मराठे 

    दि :२३ मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार पॅन इंडिया अवेअरनेस कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळया उपक्रमांचे आयोजन करण्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २३/१०/२०२१ सकाळी ९.५५ मिनीटानंतर औरगाबाद येथे मा. मुख्य न्यायमूर्ती श्री. एन. व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय व मा. प्रमुख आश्रयदाते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व न्यायमूर्ती श्री. उदय ललित कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राध्‍िाकरणाचे मोफत विधी सेवा काेणाला व कुठे मिळू शकते, (ग्रामपंचायत/ पोस्ट ऑफिस) आरोपींचे अधिकार (पोलिस ठाणे ) याबाबतचे माहितीपर फलकाचे अनावरण करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे दि. २३/रोजी १०.५५ वाजता  जिल्हयातील एकुण ६६ ठिकाणी सदर माहितीपर फलकाचे अनावरण करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आलेल्या माहितीपर फलकाचे अनावरण जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यावेळी सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश अानंद सामंत यांनी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, पोलिस ठाणे याठिकाणी विधी सेवा प्राधिकरणतर्फे माहितीपर फलकाचे अनावरण करण्यात येणार असल्याबाबत माहिती दिली.
रत्नागिरी तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, रत्नागिरी नगरपरिषद, नाचणे ग्रामपंचायत, खेडशी ग्रामपंचायत, कुवारबांव ग्रामपंचायत, हातखंबा ग्रामपंचायत, रत्नागिरी शहर पोलिस ठाणे, रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे, रत्नागिरी पोस्ट ऑफिस, टिळक मेमोरियल पोस्ट ऑफिस, नाचणे पोस्ट ऑफिस आणि शिवाजीनगर  पोस्ट ऑफिस येथे नवीन नियुक्त अतिरिक्त सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग – १ श्रीमती एस.एच.पाटील, श्रीमती आर.बी.यादव, श्री. एम.डी.महाडीक, श्रीमती एल.पी.रॉड्रीग्ज,  श्री. के.ए.यादव, श्री. एम.आर.काळे, श्रीमती एम.एम.पाटील, श्री. एम.ए.शिंदे,   श्री. पी.आर.भोसले, श्री. एस.एस.नलावडे आणि श्रीमती टी.आर.गुरव,  यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लांजा, राजापूर, दापोली, चिपळूण, खेड, गुहागर आणि देवरूख येथील नगरपालिका, तहसीलदार कार्यालय, पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत आणि पोलिस ठाणे अशा एकूण ५३ ठिकाणी माहितीपर फलकाचे अनावरण करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.