जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा
सांगली: अय्यान पटेल
दि.२: केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी आदि उपस्थित होते.
यावेळी कडेगाव व शिराळा तालुक्यांनी या अभियानांतर्गत चांगली कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे अभिनंदन केले. यावेळी गर्भवती महिलांच्या आरोग्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.