कल्याणराणा आवाडे इचलकरंजी जनता बँकेत आकर्षक व्याजदराची दीर्घ मुदत डेक्कल बाँड योजना सुरू

इचलकरंजी: विजय मकोटे

दि. ७: कल्याणराणा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या वतीने नववर्षाच्या शुभारंभानिमित्त आकर्षक व्याजदराची दीर्घ मुदत डेक्कल बाँड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ बँकेचे चेअरमन श्री. स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या बाँड योजनेअंतर्गत सभासद, ठेवीदार तसेच बँकेच्या कार्यक्षेत्रात राहणारे कोणतेही नागरिक, संयुक्त ठेवीदार, प्रोप्रायटरशिप फर्म, पार्टनरशिप फर्म, ट्रस्ट, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF), एलएलपी तसेच सहकारी संस्था बाँड खरेदी करू शकतात. या योजनेसाठी किमान गुंतवणूक रक्कम रुपये ९,०००/- असून त्यापुढे रुपये ९,०००/- च्या पटीत गुंतवणूक करता येणार आहे.
या बाँड योजनेची कालावधी १२० महिने म्हणजेच १० वर्षे असून सर्वसामान्य नागरिकांसाठी ९% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ९.७५% इतका आकर्षक व्याजदर देण्यात येणार आहे. बाँडवरील व्याज हे बाँडधारकांच्या सूचनेनुसार सहामाही किंवा वार्षिक पद्धतीने अदा करण्यात येणार आहे. तसेच व्याजाची रक्कम थेट बचत खाते, चालू खाते किंवा आरटीजीएस/एनईएफटी सुविधेद्वारे वर्ग करण्यात येईल.
या योजनेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी ग्राहकांनी आपल्या नजीकच्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर योजना ही मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असल्याने बँकेचे सभासद, ठेवीदार व इतर नागरिकांनी या आकर्षक व्याजदराच्या दीर्घ मुदत बाँड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे चेअरमन श्री. स्वप्निल आवाडे यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.