नागपुर : नंददत्त डेकाटे
दि. २७ जिल्हा काँग्रेस कमेटी नागपूर ग्रामीण कार्यालयात मा.ना.श्री. सुनिलजी केदार, मंत्री, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व युवक कल्याण, महाराष्ट्र राज्य, श्री. राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी, मा.सौ.रश्मीताई श्यामकुमार बर्वे, अध्यक्ष, जिल्हा परिषद नागपूर, मा.श्री नानाभाऊ गावंडे, प्रेदश उपाध्यक्ष आणि मा.श्री सुरेश भोयर, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, नागपूर तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टीचे श्री महेश बमनोटे यांचे प्रमुख उपस्थितीत तसेव सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य व सहयोगी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य यांची बैठक पार पडली व यामध्ये सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी मिळुन एकमताने प्रा.अवंतीका रमेश लेकुरवाळे यांची भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस जिल्हा परिषद गटनेता पदी नियुक्ती करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मुळक यांच्या विशेष देखरेखीखाली सर्व कार्यवाही व कागदपत्रे तयार करण्यात आली. तद्नंतर मा.उपाध्यक्ष, यांचे निवासस्थानी सर्व जिल्हा परिषद सदस्य, जमा झाले व मा.जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गट नोंदणीची औपचारीकता पुर्ण करण्यात आली. ही संपुर्ण प्रकीया मा.मंत्री महोदय श्री सुनीलजी केदार साहेब, जिल्हाध्यक्ष तथा मा.मंत्री मा. श्री राजेंद्रजी मुळक, प्रदेश उपाध्यक्ष, मा.श्री नानाभाऊ गावंडे, मा.सौ.रश्मीताई श्यामकुमार बर्वे, अध्यक्ष,जिल्हा परिषद नागपूर, मा. श्री मनोहर कुंभारे, माजी उपाध्यक्ष, मा.सौ.भारती पाटील, सभापती, अर्थ व शिक्षण समिती, मा.सौ. नेमावली माटे, सभापती, समाज कल्याण समिती, मा.श्री तापेश्वर वैद्य, सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती, व मा.सौ.उज्वला बोढारे, सभापती महिला व बाल कल्याण समिती, यांचा विशेष मार्गदर्शनामध्ये पार पडली या गटमध्ये काँग्रेसह सहयोगी सदस्य, शे.का.प. श्री समिर उमप तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टीचे मा.श्री हरिषजी उके, सदस्य जिल्हा परिषद नागपूर यांचाही समावेश आहे. गटनेता पदी प्रा.अवंतीका लेकुरवाळे यांच्या नावाचे सुचक मा.प्रकाश खापरे, जिल्हा परिषद सदस्य तर अनुमोदक मा.श्री दिनेश ढोले, जिल्हा परिषद सदस्य यांनी तर प्रास्ताविक मा.रश्मीताई श्यामकुमार बर्वे, व आभार प्रदर्शन मा.श्री प्रकाश खापरे, सदस्य, जिल्हा परिषद नागपूर यांनी केले.
सर्व मान्यवरांनी गटनेता पदी नवनिर्वाचित प्रा.अवंतीका लेकुरवाळे यांदचे मन:पुर्वक अभिनंदन केले.
Comments are closed.