डोंबारी-कोल्हाटी समाजातील युवक-युवती व शालेय विद्यार्थ्यांसाठी जातीचे दाखले, आधार कार्ड, उत्पन्नाचे दाखले वितरण समारंभ संपन्न

आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते वितरण

इचलकरंजी: विजय मकोटे

दि:३० लाखेनगर परिसरातील कोल्हाटी समाज मंदिर येथे डोंबारी-कोल्हाटी समाजातील युवक-युवती व शालेय विद्यार्थ्यांसाठी जातीचे दाखले, आधार कार्ड, उत्पन्नाचे दाखले वितरण समारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि आवाडे जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते.
आधारकार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्यास शाळेमध्ये शिष्यवृती, गॅस सबसिडी, बँकेत खाते उघडण्यासाठी, पॅन कार्ड काढण्यासाठी तसेच इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या योजनेचा सर्व सामान्य नागरिकाना,महिलांना,विद्यार्थी वर्गाला याचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले वेळेत मिळाल्याने त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान दूर झाले आहे.
याप्रसंगी नगरसेवक सुनिल पाटील, श्रीरंग खवरे, बाळासाहेब कलागते, धोंडीराम जावळे, रवि जावळे, अहमद मुजावर, चंद्रकांत जावळे, शामराव किसन जावळे, शांताराम लाखे, रंगराव महिपती लाखे, प्रताप लाखे आदींसह मान्यवर व भागातील नागरिक उपस्थित होते. शेवटी संतोष लाखे यांनी आभार मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.