आचार्यश्री आनंद युवा मंच कडून दिवाळी फराळचे वाटप

गरजवंतांना साहित्य देत आनंद केला द्विगुणित

इचलकरंजी: मनोज खेतमर
दि9 नोव्हेंबर:आचार्यश्री आनंद युवा मंचच्या वतीने सुरु असलेल्या आनंद गुरू मोफत चपाती भाजी सेवा केंद्रावर दिवाळीमध्ये गोरगरीबांना फराळा व साहित्याचे वाटप करुन त्यांचाही आनंद द्विगुणित केला. उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
इचलकरंजी शहरातील गरजवंत भुकेला राहू नये सर्वसामान्य जनतेस पोटाला आधार मिळावा या उदात्त हेतूने आनंद गुरू मोफत चपाती भाजी सेवा केंद्र येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी दररोज 200 जणांना मोफत चपाती-भाजी देण्याचे कार्य चार 131 दिवस झाले सुरु आहे. मागील चार वर्षापासून हा उपक्रम बसस्थानक येथे आठवड्यातून दोन दिवस सुरू होता, त्याला रोजच्या सेवा उपक्रमात अंमलबजावणी करण्यासाठी दानशूर व्यक्तींचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. हा उपक्रम सुरू करण्याची संकल्पना मंचचे प्रमुख प्रितम बोरा यांनी मांडली. त्यामध्ये त्यामध्ये मंचचे सदस्य राजेंद्र बोरा,रितेश चोपडा,सुमीत मुनोत, सुभाष गुगळे,जितेंद्र जैन, सुमतीलाल शहा, पंकज बाबेल, राकेश बंब दररोज सेवा देण्यास हजर असतात तर मंच चे इतर सदस्य आठवड्यातून एक दिवस सेवेत राहून सहकार्य करतात. या उपक्रमाचा दररोजचा खर्च 3500 ते 4000 आहे. या उपक्रमाला मदत म्हणुन एक दिवसाचा खर्च म्हणून 3100 रुपये घेतले जातात, असे प्रितम बोरा यांनी सांगितले.
त्याच अंतर्गत दिवाळी एक संधी गरीब जरूरतमंदसाठी हा उपक्रम राबवला. त्यामध्ये अनेक बांधावानी वापरात नसलेले चांगले कपडे दिले. ते गरजवंतांना देण्यात आले. त्याचबरोबर त्यांना फराळ साहित्य देऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. दिवाळी फराळ प्रकाशालाल प्रितमकुमार बोरा परिवाराच्यावतीने देण्यात आला. यावेळी ऑल इंडिया स्थानकवासी जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये मंत्री म्हणुन निवड झाल्याबद्दल जीवनजी पुनमिया यांचा सत्कार उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, दिलीप मुथा, भरत बोहरा, राजेंद्र कोठारी, प्रशांत बोरा, भाजपा उद्योग आघाडी शहर अध्यक्ष प्रितम बोरा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महेंद्र बोरा, अक्षय शहा, राजेंद्र बोरा, रितेश चोपडा, सुमीत मुनोत, सुभाष गुगळे, जितेंद्र जैन, सुमतीलाल शहा, पंकज बाबेल उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.