दुचाकी वाहनाकरिता नविन मालिका बुधवारपासून सुरू
सांगली: अय्यान पटेल
दि.१७: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 ई वाय (EY) ही नवीन मालिका बुधवार, दि. 22 एप्रिल 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
एम एच १0 ई वाय (EY) या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ४ तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या ५(अ) मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत, ई-मेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन ४.0 या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (DY. RTO SANGLI) या नावे सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास दि. २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेची डीडी जो अर्जदार सादर करेल त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.