इचलकरंजी महानगरपालिकेत स्व. के. एल. मलाबादे यांना अभिवादन
इचलकरंजी :विजय मकोटे
दि .१८: येथील महानगरपालिकेच्या वतीने माजी आमदार तथा माजी नगराध्यक्ष स्व. के. एल. मलाबादे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार, दि. १६ एप्रिल रोजी महानगरपालिका सभागृहात अभिवादन करण्यात आले.यावेळी महापौर उदय धातुंडे व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते स्व. मलाबादे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, मागासवर्गीय सभापती रुबन आवळे, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, नगरसेविका मनीषा नवनाळे, नंदु परळकर यांच्यासह उपायुक्त राहुल मर्ढेकर, अशोक कुंभार, विद्या कदम, मुख्य लेखा अधिकारी विकास खोळपे, शिक्षण अधिकारी बी. एम. कासार, प्रशांत नवनाळे, सहायक आयुक्त सुनिल शिंदे, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, शहर अभियंता बाजी कांबळे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, संदीप जोशी, अजय जाधव, प्रविण बुगड, सचिन शेडबाळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.