डीकेटीईतर्फे सांगलीमध्ये आयोजित प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी विजय मकोटे

दि १५ नोव्हेंबर ः १२ वी नंतर इंजिनिअरींग प्रवेश प्रक्रियेदरम्यान विदयार्थी व पालक यांनी या प्रवेशप्रक्रियेतील टप्प्यांदरम्यान होणा-या चुका व गैरसमजुती कशा टाळाव्यात तसेच चालू वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेतील वेगळेपणा या मुददयांची सखोल माहिती देण्यासंदभार्र्त डीकेटीईतर्फे सांगलीमध्ये खरे  मंगल कार्यालय हॉलमध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया नियमावली बनविणा-या तज्ञ मार्गदर्शक गर्व्हमेंट कॉलेज, औरंगाबादचे प्रा. डॉ. आर.व्ही. शेटकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.स्वागत पर भाषणामध्ये डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले यांनी महाविद्यालयाची ठळक वैशिष्टये आपल्या बोलण्यातून अधोरेखीत करुन प्रवेश घेते वेळी महाविद्यालयाची निवड करीत असताना त्या महाविद्यालयास प्रत्येक्ष भेट देवून तेथील गुणवत्ता,शिकवण्याची पध्दत व प्लेसमेंट याचा गांभिर्याने विचार करुन योग्य त्या महाविद्यालयास पसंती दाखवावी असे सुचविले.
डॉ. शेटकर यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान सेंटरवर पुरविल्या जाणा-या सुविधा व त्यांची कार्यपध्दती यांची इत्यंभूत माहिती दिली तसेच खुल्या व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग विभागामध्ये प्रवेश मिळविण्याकरीता आवश्यक असलेल्या अटींची व निकषांची परिपूर्ण माहिती दिली. विविध फे-यांसाठी ऑपशन फॉर्म भरण्यासंदर्भात व त्या दरम्यान होणारी संभ्रम अवस्था टाळण्यासाठी मार्गदर्शन केले. करिअर निवडीतील संभाव्य चुका टाळण्यासाठी जास्तीत जास्त विकल्पांची यादी पूर्णतः विचार करुन तयार ठेवण्याचे, प्रवेशातील टप्प्यांबद्दल इत्यंभुत माहिती एसएमएस द्वारे मिळविण्यासाठी योग्य पासवर्ड व मोबाईल नंबर नोंदविण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामध्ये त्यांनी विद्यार्थी व पालकांच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंबंधीच्या सर्व शंकांचे निरसन केले. सदर कार्यक्रमात ४०० हून अधिक विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आभार डे.डायरेक्टर डॉ.सौ.एल.एस.आडमुठे यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन कानिटकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. व्ही.आर.नाईक, डॉ.डी.व्ही.कोदवडे, डॉ.एस.ए.पाटील डॉ. कंठे, टीपीओ प्रा.जी.एस. जोशी, प्रा. एस.बी.अकिवाटे यांनी केले तसेच सदर कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.