कबनूरमध्ये जनगणना 2027 प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा यशस्वी

इचलकरंजी: विजय मकोटे
दि.३: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील Venkateshwara High School Kabanur येथे जनगणना 2027 अंतर्गत दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण उत्साहात पार पडले. प्रशिक्षणामध्ये सहभागी प्रगणकांना जनगणनेच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर लक्षात घेऊन ट्रेनिंग ॲप्सचे प्रात्यक्षिक (डेमो) घेण्यात आले. प्रत्यक्ष कामकाज अधिक सुलभ व अचूक व्हावे यासाठी ॲप्सचा वापर कसा करायचा, माहिती कशी नोंदवायची आणि सर्वेक्षणाची प्रक्रिया कशी पार पाडायची याचे मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणानंतर प्रगणकांनी Phulenagar, Kabanur या परिसरात प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण केले. त्यामुळे प्रशिक्षणात मिळालेल्या माहितीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
या उपक्रमामुळे जनगणना 2027 चे काम अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.