शरद नर्सिंग महाविद्यालयास परवानगी
शरद नर्सिंग महाविद्यालयास परवानगी अनिल बागणे यांची माहिती
यड्राव: विजय मकोटे दि.23 नोव्हेंबर: श्री शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशन अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत शरद कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयासाठी ए.एन.एम. (ANM) अभ्यासक्रमास महाराष्ट्र राज्यनर्सिंग आणि पॅरामेडिकल एज्युकेशन बोर्ड, महाराष्ट्र नर्सिंग कौंसिल व महाराष्ट्र शासन यांच्याकडून परवानगी मिळाल्याची माहिती संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी दिली. दोन वर्षे कालावधी असणा-या ह्या अभ्यासक्रमाला सर्व शाखेच्या (आर्टस, कॉमर्स, सायन्स) 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. अनुसुचित जाती व जमाती (SC, ST) विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती मिळणार असून मुलींसाठी प्राधान्य राहणार आहे. महाविद्यालयात अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज लॅब, प्रात्यक्षिकाकरीता हॉस्पिटल यांची सोय आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या आरोग्य विभागात, शासकिय रुग्णालयात, खाजगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह वैद्यकीय क्षेत्रात सेवेची संधी मिळणार आहे. तसेच या महाविद्यालयातही शरद पॅटर्नचे अनुकरण होणार असल्याने दर्जेदार शिक्षण, प्रात्यक्षिकावर अधिक भर, शिस्त राहणार आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठीचे प्रवेश सुरु झाले असल्याचे श्री. बागणे यांनी सांगितले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.