माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना ताराराणी तर्फे अभिवादन

इचलकरंजी:विजय मकोटे

दि 25 नोव्हेंबर 2021 -माजी उपपंतप्रधान, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी ताराराणी पक्षातर्फे साजरी करण्यात आली. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ताराराणी पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास प्रकाशराव सातपुते, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, अरुण आवळे, बाबासाहेब पाटील, अविनाश कांबळे, महावीर कुरुंदवाडे, महेश सातपुते, चंद्रकांत इंगवले, सुभाष जाधव, शैलेश गोरे, एम. के. कांबळे, आर के पाटील, सर्जेराव पाटील, राजू बचाटे, मनु फरास, दत्तात्रय कसलकर, सुरेश कोल्हापूरे, बंडोपंत लाड, मुरारजी देसाई राजू माळी, रमेश पाटील, प्रताप लाखे, राकेश मगदूम, प्रविण केसरे, तौफिक जमादार, कुमार पलंगे, राजु दरिबे, बजरंग कुंभार, सुखदेव माळकरी, विजय पाटील, सौ. लक्ष्मी सपाटे, सौ सुवर्ण लाड यांच्यासह ताराराणीचे पदाधिकारी व आवाडे समर्थक उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.