दि यशवंत को-ऑप प्रोसेसर्सला ४.९३ लाखांचा नफा; आधुनिकीकरणाच्या दिशेने संस्थेची वाटचाल
इचलकरंजी: विजय मकोटे
दि५ जुलै २०२६ : इचलकरंजीतील प्रोसेसिंग व्यवसायातील जुनी, नामवंत व मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि यशवंत को-ऑप प्रोसेसर्स संस्थेची प्रगतीकडे वाटचाल सुरू असून, अहवाल वर्षात संस्थेला ४ लाख ९३ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सर्व सभासद, संचालक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे संस्थेचे आधुनिकीकरण वेगाने सुरू असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन अहमद मुजावर यांनी केले.
संस्थेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी प्रास्ताविकात अहवाल वर्षातील कामकाजाचा आढावा घेताना अहमद मुजावर बोलत होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन तथा संस्थेचे मार्गदर्शक स्वप्निल आवाडे यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी विविध विकास योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. “यशवंत संकुल” उभारणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यात पूर्वेकडील बाजूस नवीन संकुलाचे बांधकाम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संचालक मोहन काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्यवस्थापक शफिक मणेर यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. सभेपुढे ठेवण्यात आलेले सर्व विषय उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूर केले.सभेला महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या अध्यक्षा वैशाली आवाडे, सौ. प्राप्ती आदित्य आवाडे, संचालक आदित्य आवाडे, चंद्रकांत घाटगे, श्रेणिक मगदूम, रवि जावळे, रणजितसिंह गायकवाड, योगेश पाटील, आनंदा दोपारे, रमेश कबाडे, मोहन काळे, राजेश भिसे, सुहास कांबळे, सौ. जेवरबानू दुंडगे, लक्ष्मी सपाटे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अरुण निंबाळकर यांनी केले, तर उपाध्यक्ष राजाराम बोंगार्डे यांनी आभार मानले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.