डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमाचा एमएसबीटीई परिक्षेत उच्चांकी निकाल

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी

ता.९: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परिक्षा २०२५-२६ मध्ये डीकेटीईच्या डिप्लोमा टेक्स्टाईल विभागाचा उच्चांकी निकाल लागला आहे. टेक्स्टाईल डिप्लोमाच्या तिन्ही विभागातून दर्शन जितेंद्र श्रीश्रीमाल हा ९०.६५ टक्के गुणांसह डिप्लोमा विभागात सर्वप्रथम आला आहे. संस्थेतील ३५ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये तर ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
डिप्लोमा इन टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरर्स विभागातील प्रथम वर्षात- दर्शन श्रीश्रीमाल ९०.६५ टक्के, यश चितलांगिया ८७.६५ टक्के, अंजली पाटील ८२.८३ टक्के, द्वितीय वर्षात- आर्यन जाधव ८७.३९ टक्के, साकिब नदाफ ८६.०४ टक्के, प्रांजल मगदूम ८१.३७ टक्के, तृतीय वर्षात- शंतनू केस्तीकर ८९.४५ टक्के, राजवर्धन काकडे ८८.२८ टक्के, अरुष दिंडे ८५.५९ टक्के अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला. संस्थेतील डिप्लोमा इन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी विभागात प्रथम वर्षात दृष्टी उमारनिया- ८३.७७, मुजामिल मिस्त्री- ८१ टक्के, समकित चंगेडिया- ७७.४७ टक्के, द्वितीय वर्षात- प्रकाश घटटे ८६.९६ टक्के, मलिकरेहान कलावंत ८३.९९ टक्के, क्षितीज भांडवले ८२.८४ टक्के, तृतीय वर्षात- रेहान नायकवडी- ९०.३७ टक्के, शुभांगी कुंभार- ९० टक्के, श्रेय गजमल ८९.७८ टक्के  गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला. तसेच डिप्लोमा इन फॅशन अँण्ड क्लोदिंग टेक्नॉलॉजी विभागात प्रथम वर्षात- आदिती साखरे- ८२.५९ टक्के, मदिया बोरकर- ८०.३० टक्के,, सुपर्णा पाटील- ७८.१२ टक्के, द्वितीय वर्षात- प्रतिभा मगदुम ८४.५६ टक्के, ईश्‍वरी रंगापुरे ८१.७५ टक्के, पूजा चौधरी ७८.०५ टक्के, तृतीय वर्षात- आरती जाधव ८९.३३ टक्के, पूर्वा जाधव ८८.६७ टक्के, श्रेया सरबी ८३.११ टक्के, गुणांसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविला.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, सर्व ट्रस्टी यांनी भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संचालिका डॉ एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील, विभागप्रमुख प्रा.आर.के.वळसंग तसेच सर्व प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.