नासिर गवंडी यांची इंटकच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

इचलकरंजी : विजय धुत्रे 

दि.२७ जुलै २०२६ : भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) महासंघाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाची नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, कामगार चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते नासिर गवंडी यांची कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

           इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष होशिलप्रसाद शर्मा यांच्या मान्यतेने तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुभाष सावन माचरे यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि जिल्हाध्यक्ष ताजुद्दीन खतीब यांच्या उपस्थितीत नासिर गवंडी यांना प्रदान करण्यात आले. या नियुक्तीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात इंटकची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अधिकाधिक सदस्य संघटनेशी जोडणे, कामगारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे तसेच इंटकचे ध्येय, धोरणे आणि विचार सामान्य जनतेपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्यासाठी ते कार्यरत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

           नासिर गवंडी यांच्या नियुक्तीचे कामगार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून स्वागत करण्यात येत असून, विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे कोल्हापूर जिल्ह्यात इंटकची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.