इचलकरंजीत ईद-ए-मिलाद निमित्त भव्य सद्भावना रॅली

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश; हजारो मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी 
दि .२६: प्रेषित हजरत माेहम्मद पैगंबर यांनी जगाला जाे मार्ग दाखवला, ज्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली, त्याचे आपण सर्वांनी अनुकरण केले तर संपूर्ण जगात सुख, शांतता आणि सुव्यवस्था कायम राहील. वस्त्रनगरी इचलकरंजीत हिंदु-मुस्लिमच नव्हे तर सर्व समाजबांधव सलाेख्याने रहात आहेत. आपल्या देशाची सर्वधर्म समभावाची संस्कृती जपत पुढेही आपण सर्वजण असेच गुण्या-गाेविंदाने राहुया, असे आवाहन काेल्हापूर परिक्षेत्राचे पाेलिस महासंचालक रंजनकुमार शर्मा यांनी केले. यावेळी पाेलिस अधिक्षक निलाेत्पल यांची प्रमुख उपस्थिती हाेती. यावेळी भव्य शाेभायात्रा काढण्यात आली. रॅलीच्या सुरुवातीला देशाची शान तिरंगा आणि मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का-मदिना यांची प्रतिकृती सर्वांचेच लक्ष वेधत हाेती.
 
      ईद ए मिलाद अर्थात माेहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त इचलकरंजी येथे बुधवारी चिस्तिया मस्जिद सुन्नत जमात इंदिरानगर, मीनाइया मस्जिद कलानगर, सुन्नी कुरेशी मस्जिद काेल्हापूर राेड, गरीब नवाज मस्जिद कृष्णानगर व समस्त मुस्लिम समाज यांच्या वतीने  सद् भावना रॅलीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या सद् भावना  रॅलीचा शुभारंभ इंदिरानगर येथे काेल्हापूर परिक्षेत्राचे पाेलिस महासंचालक रंजनकुमार शर्मा यांचे हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते.
यावेळी अप्पर पाेलीस अधिक्षक अण्णासाहेब जाधव, पाेलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड, पाेलीस निरीक्षक शरद मेमाणे, महेश चव्हाण, गजेंद्र लाेहार, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपाेनि विकास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. या रॅलीत ज्येष्ठ नागरिक, युवकांसह, लहान बालके, महिला आणि हजाराेंच्या संख्येने मुस्लीम बांधवानी सहभाग घेतला हाेता. घाेडे, उंट यासह आकर्षक रथ यांचा रॅलीत समावेश हाेता. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा या देशभक्तीपर गीताने शाेभायात्रेतील वातावरण न्हाऊन गेले हाेते. इंदिरानगर येथून सद् भावना रॅलीला सुरवात झाली. त्यानंतर थाेरात चाैक, काॅ. मलाबादे चाैक, महात्मा गांधी पुतळा, राजवाडा चाैक मार्गे गावभागातील हजरत सय्यद मख्तुम वली दर्गाह येथे रॅलीची दुवा पठण हाेऊन सांगता करण्यात आली.
शहर व परिसरात वाढत्या नशिल्या पदार्थांच्या व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर रॅलीमध्ये झाकीर हुसेन तरुण मंडळाच्या वतीने से नाे ड्रग्ज, जस्ट से नाे ड्रग्ज, अंमली पदार्थांपासून दूर रहा असा संदेश देणारा फलकही सर्वांचे लक्ष वेधत हाेता. तर पैगंबर जयंती निमित्त आयाेजित महाप्रसाद हा सध्या सुरु असलेला श्रावण मास लक्षात घेऊन मांसाहार टाळत शाकाहारी करण्यात आला हाेता.
स्वागत अजीज खान यांनी तर प्रास्ताविक सलीम आत्तार यांनी केले. आभार जब्बार झारे यांनी मानले. रॅली यशस्वीतेसाठी रियाज सपसागर, बशीर करडी, इफ्तेखार मुल्ला, मुश्ताक जमादार, दस्तगीर आत्तार, शाकिरअली खान, माेहमदअली खान, शकिल खान, मुबीन बेपारी, कय्युम शेख, महमंद मकानदार, अल्लाबक्ष लक्षमेश्वर, ताजअहमद लक्षमेश्वर, फजलुल्ला शेख,  अब्दुलमजीद खुदावंत,  यांच्यासह डाॅ. झाकीर हुसेन तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.