राखीच्या धाग्यातून भगिनींनी जपले गणपतराव दादा पाटील यांच्याप्रती आपुलकीचं नातं

शिरोळ : कयुम शेख 

दि.३१: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या निमित्ताने येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी शिरोळ तालुक्यातील मोठ्या संख्येने माता-भगिनींनी आवर्जून उपस्थित राहून श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील यांना राखी बांधून पवित्र बहीण भावाचे आपुलकीचे नाते जपले आहे.याप्रसंगी गणपतराव पाटीलदादा बोलताना म्हणाले की, माझ्या मनगटावर बांधलेला हा राखीचा धागा केवळ एक धागा नाही, तर त्यामागे असलेले भगिनींचे निस्सीम प्रेम, विश्वास, आशीर्वाद आणि आपुलकीची भावना आहे. भावाप्रती असलेले भगिनींचे हे निर्मळ प्रेम पाहून  मन अक्षरशः भारावून गेले. माता-भगिनींच्या या प्रेमाचा आणि विश्वासाचा सन्मान राखत, त्यांच्या सुख-दुःखात सदैव सोबत राहण्याचा आणि त्यांच्या सन्मानासाठी, सुरक्षिततेसाठी व प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प आजच्या या पवित्र दिवशी अधिक दृढ झाला.


यावेळी जयसिंगपूरच्या नगरसेविका सौ. अनिता कोळेकर, महिला काँग्रेस जयसिंगपूर शहर अध्यक्षा आम्रपाली कारंडे, प्रियांका जाधव, योगिता घुले, जुबेदा शेख, संपदा विभुते, अर्चना कांबळे, निलम कांबळे यांच्यासह , काँग्रेस जयसिंगपूर शहर अध्यक्ष सुदर्शन कदम ,सरदार कारंडे, अनुसुचित जाती विभाग अध्यक्ष विनायक कांबळे, राहुल घाटगे यांच्यासह तालुक्यातील माता-भगिनी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.