रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन च्या वतीने व्हीलचेअर व तीन चाकी सायकल वितरण कार्यक्रम संपन्न
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१३ : येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी शहर व परिसरातील गरीब व गरजू व्यक्तींना/ रुग्णांना व्हीलचेअर, तीन चाकी सायकल व एका व्यक्तीस व्यायामाची सायकल मोफत वितरण कार्यक्रम रोटरी श्रीमती सोनीदेवी रा. बाहेती सेवा केंद्र, दाते मळा, इचलकरंजी येथे संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माननीय डॉ. श्री .ज्ञानेश्वर मुळे (माजी सचिव, परराष्ट्र मंत्रालय भारत सरकार) व श्रद्धा अकॅडमीचे श्री ए .आर तांबे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज कोठारी यांनी सर्वांचे स्वागत केले .उपक्रमाची माहिती प्रोजेक्ट चेअरमन मुकेश जैन यांनी विशद केली .पाहुणे डॉ. ज्ञानेश्वर मुळे व श्री .ए .आर तांबे यांची ओळख मनीष मुनोत यांनी करून दिली. यानंतर बेघर निवारा केंद्रातील गरजू व्यक्तींना सहा व्यक्तींसाठी व्हीलचेअर, तीन चाकी सायकल व एका व्यक्तीस व्यायामाची सायकल वाटप समारंभ पार पडला. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन ने गरजू व्यक्तींना आधार देऊन हा स्तुत्य उपक्रम राबविला याबद्दल डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनीकृतज्ञता व्यक्त केली.

पुढील काळातही ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन व रोटरी क्लब इचलकरंजी यांनीअसेच कार्य चालू ठेवावे असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्रद्धा अकॅडमीचे श्री ए.आर. तांबे यांनीही यास्तुत उपक्रमाबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले .कार्यक्रमावेळी रोटरीचे अभय येळरुटे, शिवदास कित्तुरे ,मनीष मुनोत, सत्यनारायण धूत, मुकुंद माळी ,अजित कुरडे, संतोष पाटील ,सागर पाटील, नितीन भागवत ,संजय घायतिडक ,तसेच मुळे फाउंडेशनचे वृषाली साळी, संजय मुळे ,कल्चरल शैक्षणिक इनचार्ज अँडव्होकेट बाबासाहेब निकम ,उद्योगपती रमेश जी. पटेल ,उज्वल साठे, गुरुकुलचे प्राचार्य गणेश नायकुडे, डॉ. कित्तुरे, उद्योगपती रवी आचलकर, बेघर निवारा केंद्राच्या व्यवस्थापिका उषा येलपले, उपस्थित होत्या ,शेवटी आभार रोटरी क्लबचे सेक्रेटरी सुनील येळरूटे यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनंदन देशमुख यांनी केले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.