टेबल टेनिस स्पर्धेत इंदुमती आवाडे मयूर हायस्कूलचे दैदिप्यमान यश

इचलकरंजी : विजय मकोटे 

दि.३: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर तसेच इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय शासकीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत सौ. इंदुमती आवाडे मयूर हायस्कूलच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी व्यंकटराव हायस्कूल येथे या स्पर्धा पार पडल्या.
१४ वर्षे मुलींच्या गटात रुद्रा टेंबुगडे, दूर्वा औताडे, अनघा येलपल, हुमेरा कलावंत व इकरा मुल्ला यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. १९ वर्षे मुलींच्या गटात जानवी टेंबुगडे, चेतना नाईक, शितल सनदी, किरण माने व तेजल कदम यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तर १९ वर्षे मुलांच्या गटात गणेश लाखे, पवन येलगट्टी, गणेश पाटील, अनिकेत चौगुले व रोहिदास कमदोड यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल संस्थाध्यक्षा डॉ. सौ. पद्मावती पाटील यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. सेक्रेटरी डॉ. रत्नाकर पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. मुख्याध्यापिका सौ. पी. एम. पाटील यांचे सहकार्य, तर क्रीडा शिक्षिका सौ. एस. एस. माने यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.