शाश्वत विकासासाठी मानवाचा पर्यावरणास हानिकारक हस्तक्षेप थांबविला पहिजे.
प्रा. डॉ. पी. एस. पाटील
इचलकरंजी: संजय आंबेे
दि१८ डिसेंबर : येथील डी. के. ए. एस. सी. कॉलेजमध्ये हवामान बदल : समस्या व आव्हाने या विषयावरील चर्चासत्र अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्य संपन्न झाले. या चर्चासत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. (डॉ.) पी. एस. पाटील उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ शुभांगी गावडे मॅडम उपस्थित होत्या. भारतीय हवामान शास्त्र विभागातील शास्त्रज्ञ श्रीमती आरती बंडगर व श्री. रंजन फुकन हे वक्ते म्हणून उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी केले व आभार डॉ विनायक गानबावले यांनी मानले.
हवामान व पर्यावरण बदलामागची कारणे व त्याचा मानवी व इतर सर्व जीवांवर होणार परिणाम याविषयी चर्चा झाली. प्र कुलगुरू प्रा. (डॉ.) पी. एस. पाटील यांनी शाश्वत विकासासाठी मानवाचा पर्यावरणास हानिकारक हस्तक्षेप थांबविला पहिजे असे सांगून मानवी हस्तक्षेप व नैसर्गिक स्रोतांचा अतिवापर यामुळे हवामानात बदल होऊन भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्या, परिणाम व उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय स्तरावर शैक्षणिक प्रकल्पांमधून संशोधन करून या बाबत जाणिव व जागृती निर्माण करावे सुचिवले.
प्रथम सत्रातील साधन व्यक्ती शास्त्रज्ञ श्री रंजन फुकन यांनी हवामान सेवांची मूलभूत माहिती व भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या कामकाजाचे स्वरूप याविषयी मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात शास्त्रज्ञा श्रीमती आरती बंडगर यांनी हवामानातील बदलांमुळे पर्जन्यमानावर होणारा परिणाम याविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतिश पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सदरचे चर्चा सत्र ऑनलाइन व ऑफलाईन या मिश्र पद्धतीने आयोजित करण्यात आले. सादर चचासत्रात १५० विद्यार्थ्यांनी ऑफलाईन तर ५५ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.