लोकसंख्या दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयात व्याख्यान संपन्न
कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि.१० जुलै २०२६ : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त शहाजी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व आय.क्यू.ए.सी. (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने “लोकसंख्या : काल, आज आणि उद्या” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या प्रार्थनेने झाली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून देवचंद महाविद्यालय, निपाणी येथील प्राध्यापक डॉ. राहुल म्होपरे उपस्थित होते. त्यांनी लोकसंख्येतील बदल, त्याचे सामाजिक व आर्थिक परिणाम, वाढती लोकसंख्या, लोकसंख्या नियंत्रणाची आवश्यकता तसेच भविष्यातील आव्हाने याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी लोकसंख्या विषयाकडे केवळ आकडेवारी म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
यावेळी आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. राहुल मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे, परीक्षा विभागप्रमुख व स्टाफ सेक्रेटरी डॉ. के. एम. देसाई, डॉ. सारिका मोरे, विभागप्रमुख डॉ. एस. एस. राठोड, डॉ. डी. पी. गावडे यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विभागप्रमुख डॉ. एस. एस. राठोड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. डी. पी. गावडे यांनी आभार मानले, तर प्रा. अर्जुन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.