सन्मती सहकारी बँकेचा “राष्ट्रीय पुरस्काराने” सन्मान

इचलकरंजी: हबीबशेखदर्जी
 दि.२१:   जनसामान्यांच्या विश्वासास पात्र असणारी बँक अशी ओळख असलेली इचलकरंजी येथील सन्मती सहकारी बँक लि; (मल्टीस्टेट) इचलकरंजी या बँकेस देशातील बँकिंग व सहकार क्षेत्रातील नामांकित इंडियन काे-ऑप, नवी दिल्ली या मासिक प्रकाशन संस्थेर्माफत ‘इंडीयन समिट अ‍ॅन्ड एक्सलन्स इन काे-ऑपरेटीव्ह अवाॅर्ड 2026’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दरवर्षी सहकारी व बँकिंग क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचा विशेष गाैरव या संस्थेर्माफत केला जाताे. सन 2026 सालचा हा विशेष पुरस्कार नवी दिल्ली येथे आरबीआयचे संचालक सतीश मराठे व महाराष्ट्र काे-ऑप बँक मुंबईचे प्रशासकीय मंडल अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते व आयएफएफसीओ चे कार्यकारी संचालक श्री. अवस्थी, नॅफकॅब चे अध्यक्ष लक्ष्मीदास व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार बँकेचे चेअरमन सिध्दांत सुनिल पाटील व सीईओ समीर मिर्झा मैंदर्गी यांनी स्विकारला.
          सन्मती सहकारी बँकेने मागील चार अर्थिक वर्षातील आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचे केलेले पालन, उत्कृष्ट व्यवस्थापन तसेच एनपीए, सीआरएआर, एआरसी प्राेव्हिजन, पीसीआर, सीडी रेशाे, ओपनिंग प्रॉफिट लिक्विडीटी या सर्व बाबींचे केलेले याेग्य व्यवस्थापन तसेच बँकेने काेराेना व महापुरसारख्या नैसर्गिक संकटांचा यशस्वी सामना केल्यामुळे इंडीयन समिट अ‍ॅन्ड एक्सलन्स इन काे-ऑपरेटीव्ह अवाॅर्ड 2026 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
       30 सप्टेंबर 2026 अखेर बँकेने 300 काेटी ठेवींचा टप्पा गाठला आहे. मार्च 2027 अखेर बँकेने एकूण व्यवसाय 600 काेटी रुपये करण्याचे व 350 काेटी ठेवींचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगण्यात आले. तसेच लवकरच बँक कर्नाटक राज्यातील बेळगांव या नजीकच्या जिल्ह्यात शाखा विस्तार करणार असल्याचा मानस चेअरमन सिध्दांत पाटील यांनी बाेलून दाखवला. डिजीटल बँकिंग व ऑनलाईन बँकिंग सेवा सुविधा अल्पकाळात चालू हाेणार आहे. गेली 30 वर्षे अविरत 12 शाखा व 9 एटीएम र्माफत सेवा देत असून 70 हजार ग्राहकांचा विश्वास बँकेने संपादन केलेला आहे.
बँकेचे युवा चेअरमन सिध्दांत पाटील यांनी, माजी चेअरमन सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली तसेच व्हा. चेअरमन प्रा. ए. जे. पाटील, बँकेचे बीओएम चेअरमन डाॅ. आप्पासाहेब हाेसकल्ले व सर्व संचालक आणि माजी संचालक मंडळ, सर्व सभासद, सर्व सेवक वर्ग या सर्वांच्या अथक प्रयत्न व परिश्रमातून बँकेस हा पुरस्कार मिळाल्याचे सांगीतले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.