राजिवली गृप ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपचा झेंडा

जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत साळुंखे ठरले किंगमेकर

 

आरवली: सचिन पाटोळे

दि 24 संगमेश्वर तालुक्यातील राजिवली गृप ग्रामपंचायतीच्या प्रभाग १ ची पोटनिवडणुक नुकतीच पार पडली. याचा निकाल जाहीर झाला. या निवडणूकीत भाजपने आपला झेंडा फडकावला आहे.

भाजप उमेदवार प्रशांत शिर्के यांना ११३ तर राष्ट्रवादीचे उमेदवार रुपेश कदम यांना केवळ ३७ मते मिळाली तर नोटा ला 12 मते या विजयात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत साळुंखे यांनी करिष्मा केला. या आधीही इथे निवडणूकीत भाजपचे ४ सदस्य निवडून आणण्यासाठी साळुंखे यांचा मोलाचा वाटा होता.

या विजयानंतर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, सुधीर यशवंतराव यांनी प्रशांत शिर्के यांचे देवरूख भाजप कार्यालयात अभिनंदन केले.या वेळी इतर ग्रामस्थ संदीप शिर्के,राजेंद्र शिके,दीलीप शिर्के,आत्माराम शिर्के उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.