जत मध्ये राज्यस्तर क्रॉसकंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा 2020/21 चे आयोजन

महाराष्ट्र राज्य अथेलटिकस असोसिएशन सांगली जिल्हा अम्युचअर अथलेटिक असोसिएशन व विक्रम फौंडेशन यांच्या संयुक्त उपक्रम

जत :विट्ठल हेगडे

दि 24: महाराष्ट्र राज्य अथेलटिकस असोसिएशन सांगली जिल्हा अम्युचअर अथलेटिक असोसिएशन सांगली व विक्रम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर क्रॉसकंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा 2020/21 चे जत येथे आयोोज करण्यात आले आहे. मोबाईल च्या जमान्यात ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळाचे व स्पर्धेचे महत्व समजावे म्हणून जत तालुक्याचे आमदार मा. विक्रमदादा सावंत यांनी राज्य स्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा जत ला खेचून आणली.जतला क्रॉसकंट्री खेळाची खूप मोठी परंपरा आहे ती टिकून राहावी या उद्देशाने दादा नी ही राज्य स्तरीय स्पर्धा जत सारख्या ग्रामीण भागात घेण्याचे निश्चित केले आहे.26 डिसेंमबर 2021 रोजी या स्पर्धा पार पडणार आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील जवळ जवळ 900 खेळाडूंचा सहभाग या स्पर्धे मध्ये असणार आहे.खेळाडूंची राहण्याची सोय आर आर कॉलेज जत ,शासकीय मुलींचे वसतिगृह यांचे मार्फत करण्यात आली आहे.खेळाडूंच्या जेवणाची सोय विक्रम फौंडेशन कडून करण्यात येणार आहेस्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी तालुक्यातील क्रीडाशिक्षक विजय बिराजदार, अझहर शेख ,दीपक कांबळे, सचिन चव्हाण, धनंजय काटे, परवेज गडीकर ,रवींद्र व्यवहारे , महंमदहुसेन शेख, नागेश मोठे ,सिद्धू कोरे व सर्व क्रीडा शिक्षक मेहनत घेत आहेत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.