कडवई :मुजीब खान
दि ११ जानेवारी संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील महाराष्ट्र उर्दू हायस्कूलच्या सभागृहात ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनची जनजागृती सोहळा संपन्न झाला. मुस्लिम ओबीसी समाजाच्या येणाऱ्या अडीअडचणी त्यावर मार्ग काढण्याचे काम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी उपस्थित लोकांना सांगितले.परिसरातील प्रमुख लोक यावेळी उपस्थित होते. शब्बीरभाई अन्सारी यांनी उपस्थित पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून समाजातील लोकांना येणाऱ्या अडचणीवर चर्चा केली.मुस्लिम ओबीसी नेमके काय आहेत? यात कोण कोण मोडतात? लागणारे कागदपत्र कोणती? मुस्लिम ओबीसी साठी कोण कोणते शासने जि.आर काढले आहेत याची सविस्तर माहिती देण्यात आली. ओबीसी ही जात नसून वर्ग आहे प्रत्येक व्यक्तीच्या व्यवसाया अनुसार त्या व्यक्तीस जात प्रमाणपत्र मिळते.ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या व्यक्तीना नोकरी व शिक्षणात सवलती उपलब्ध होतात.
याळी संगमेश्वर तालुक्यातील प्रमुख लोकांच्या गाठी भेटी घेण्यात आल्या. कडवई येथील महाराष्ट्र उर्दू हायस्कूल येथील सभागृहात तालुक्यातील लोकांना संवाद साधन्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन, उपाध्यक्ष जमूरत अलजी, सरचिटणीस रमजान गोलंदाज, कडवई जमातीचे अध्यक्ष सिंकदर जुवळे, नजीर जुवळे, अफसर खान, पत्रकार मुजीब खान,प्राचार्य कारागीर सर, मुश्ताक सावंत, प्रांजल मोहिते,आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.