गोकुळतर्फे पैलवान ओम चौगलेचा सत्कार…
कोल्हापूरः सौ रेणूताई पोवार
दि:०१.रांची झारखंड येथे झालेल्या नॅशनल चॅम्पिनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळविलेल्या पैलवान ओम सरदार चौगले रा.आळवे,ता. पन्हाळा याचा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत संचालक मंडळ मिटिंग मध्ये सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांनी वेगवेगळे खेळ आत्मसात करून जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल करावे.गोकुळ दूध संघ हा नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभा असतो. पैलवान ओम चौगले हा एक सामान्य दूध उत्पादक शेतकरी कुटुंबातील मुलगा असून त्याने कुस्तीमध्ये मिळवलेले यश हे निश्चीतच कौतुकास्पद आहे. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले व त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .
यावेळी जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे,कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे,चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्डसेक्रेटरी एस.एम.पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.