यंत्रमाग कामगाराचा मुलगा पंकज सुरेश खोत सी.ए.परिक्षा उत्तीर्ण

इचलकरंजी: प्रतिनिधी

दि ..१३ फेब्रुवारीः इचलकरंजी गावभाग आंबी गल्ली परिसरात रहीवाशी असणारे पंकज सुरेश खोत यांनी दि. इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकौंटंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत घेण्यात आलेली सी.ए. परिक्षा उत्तीर्ण झालेले आहे. पंकज याची घरची परिस्थीती अत्यंत प्रतिकूल आहे वडिल सुरेश खोत हे यंत्रमागावर काम करीत असून आई वैशाली खोत या इंदिरा महिला सूत गिरणी येथे काम करीत होत्या अता सध्या गृहीणी आहेत. तर बहीण पल्लवी हया डीकेटीईतून एमबीए परिक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत.

.बहीणीने शिक्षण पूर्ण केल्यानंतर जॉब करीत पंकजला मार्गदर्शन केले व सीएची परिक्षा देण्यासाठी प्रोत्साहीत केले.अशा प्रतिकूल परिस्थीत कुटुंबीयांच्या रोजच्या दैनंदीन कामकाजात हातभार लावत पंकज यांनी कठीण परिस्थीतून सी.ए. ही परिक्षा उत्तीर्ण केलेली आहे.
पंकज राहण्यास गावभाग येथे राहत असल्यामुळे जुलै २०१९व २०२१ सालामध्ये आलेल्या महापुरामध्ये पंकज याचे शालेय साहित्य वाहून गेल्यामुळे प्रचंड नुकसान झाले त्याला सावारायला वेळ लागला तसेच वारंवार होणारे लॉकडावून हातावरचे पोट असल्यामुळे कुटुंबाकडे सर्व बाबींच्याकडे लक्ष देवून अशा प्रतिकूल परिस्थीतीमध्ये त्यांनी आपली अभ्यासाची जिद्द व चिकाटी सोडली नाही व अभ्यासात प्राविण्य दाखवत मोठया कष्टाने येणा-या सर्व संकटांना सामोरे जात सी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाला.
बारावी नंतर सी.ए. इन्स्टियूट, दिल्ली येथे अ‍ॅडमिशन घेतले व व्यंकटेश महाविद्यालयातून बी.कॉम ला ऍडमिशन घेतले शिक्षणाच्या कालावधीत पहाटे ३ वाजता उठून ६ वाजेपर्यत अभ्यास करीत सकाळी १ तास ब्रेक घेत नंतर सकाळी ८ नंतर ते दु. १२ पर्यंत अभ्यास करीत असत जेवणाचा ब्रेक घेतल्यानंतर दु. २ ते ५ अभ्यास करीत होतो ५ ते ८ व्यायाम व मित्रांसाठी वेळ देत होतो आणि रात्री १० वाजता झोपी जात होतो. सी.ए. कालावधतीत ट्रेनिंगसाठी सी.ए. नरेंद्र पुरोहित व सी.ए. श्रीमधंर व्हनवाडे यांचेकडे ट्रेनिंग पूर्ण केले.
सी.ए.पूर्ण झालेनंतर आई वडिलांचे सर्व स्वप्न पूर्ण करणार असून सामाजिक हित जोपासत सर्वसामान्यांना मदत करीत राहणार असल्याचे पंकज यांनी भावना व्यक्त केली या सर्व यशासाठी आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांनी पंकजचा सत्कार केला. या सर्व यशामध्ये आई, वडिल यांच्यासोबत कुटुंबीयाचा मोलाचा वाटा आहे अशी भावना व्यक्त केली तर या सर्व यशासाठी कै. सी.ए. भालचंद्र सादळे, संग्राम नरके, संदीप नरके, सागर खोत, वैभव खोत, सारिका चव्हाण, मनस्वी सादळे, देवमोरे सर यांचे मोलाचे मागदर्शन लाभले.
फोटो ओळी – यंत्रमाग कामगारचा मुलगा पंकज सुरेश खोत सीए परिक्षा उत्तीर्ण झालेबद्दल सत्कार करीत असताना आमदार प्रकाश आण्णा आवाडे सोबत खोत कुटुंबीयातील सदस्य व इतर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.