शास्त्री गल्लीतील ३० वर्षाचा विद्युत पोलचा प्रश्न निकाली
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि .१२ फेब्रुवारी येथील प्रभाग क्रमांक १४ विक्रमनगर मध्ये शास्त्री गल्लीतील नागरिकांच्या जागेवर गेल्या ३० वर्षापासूनचे इलेक्ट्रिक पोल होते. मा. आमदार सुरेश हाळवणकर यांच्या विशेष प्रयत्नातून येथील ४ पोल व विद्युत तारा नागरिकांच्या खाजगी जागेतून काढून सरकारी रस्त्यावर करण्यात आले. असून आता येथील नागरिकांना आपले घर बांधण्याच्या मार्ग मोकळा झाला असून याचे उद्घाटन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील प्रभाग क्रमांक १४ विक्रमनगर येथील शास्त्री गल्ली ( गोसावी गल्ली) मधील जाधव घर ते गोसावी घर येथील नागरिकांच्या खाजगी जागेमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाचे इलेक्ट्रिक पोल गेल्यामुळे त्याच्या विद्युत तारा ह्या सर्वांच्या घरावरून गेल्या ३० वर्षापूर्वी पासून गेल्या आहेत. त्यामुळे येथील सुमारे ३० नागरिकाना घर बांधण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबाबत भाजप प्रभाग क्रमांक १४ अध्यक्ष दीपक पाटील यांच्या माध्यमातून मा. आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडे सदर पोल बदलण्याची मागणी केली होती.
या कामाला मंजुरी मिळाली असून सदर सर्व पोल व विद्युत तारा काढण्यात आले असून हे सर्व पोल सरकारी रस्त्यावर लावण्यात आले आहे.
याचे उद्घाटन मा. सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. उपनगराध्यक्ष सुनील महाजन, भाजप शहराध्यक्ष अनिल डाळ्या, रिषभ जैन, शिवसेना विभाग प्रमुख सदा दीपक, भाजप प्रभाग क्रमांक १४ अध्यक्ष दीपक पाटील, उत्तम कुंभार, संतोष कांदेकर, सागर कुंभार, बूथ प्रमुख सौ. अंजली संकपाळ, रेखा आरेकर, अजित कांबळे, युवा सेना उपशहर प्रमुख विकास जाधव, सौ. अनुराधा पाटील, अनिल लोंढे, कामिनी मोरे, मदन माधव, मयूर दाभोळकर, लोहित ढवळे, ओंकार मगदूम, सौ. सुनिता पारिट, छाया कवडे, श्रीमती शांताबाई शिंदे, जन्नत गवंडी, सरिता शिंदे, विजय आरेकर, शिवाजी चौगुले, अमित तोडकर, सागर मांगलेकर, प्रदीप मळगे, शब्बीर बागवान, रणजीत गोसावी, रफिक चाऊस, रशीद आंबी, नामदेव तावरे, योगेश शितोळे, रोहन माधव, बबन आरेकर यांच्यासह नागरिक महिला मोठ्या संख्यांनी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.