कल्याण मध्ये रंगले कवी संमेलन

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या आठवणींनी कवितेतून उजाळा

 

ठाणे : प्रतिनिधी

दि .१ मार्च सार्वजनिक वाचनालय कल्याण व कल्याण, डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने (पु. भा. भावे व्याख्यानमाला) अंतर्गत कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिन व मराठी राजभाषा दिनानिमित्त सार्वजनिक वाचनालय, कल्याण येथे कवी संमेलन पार पडले. यावेळी जेष्ठ साहित्यिक चंद्रशेखर भारती, रंगकर्मी सुधीर चित्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी कविवर्य कुसुमाग्रज यांची एक कविता व स्वलिखित एक कविता कवी, कवयित्री यांनी सादर केल्या

मराठी भाषा ही रोजगाराची भाषा झाली पाहिजे. मराठीचा गौरव, जयघोष दररोज झाला पाहिजे. असे जेष्ठ साहित्यिक चंद्रशेखर भारती यांनी बोलतांना सांगितले.

आपण कोणत्याही भाषेतून शिकलो तरी आपली मूळ भाषा विसरू नये.जो नेहमीच साहित्य वाचतो त्याची भाषा समृद्ध असते.असे रंगकर्मी सुधीर चित्ते यांनी बोलतांना सांगितले.

यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर , डॉ. अमिता कुकडे, डॉ. परिघा विधाते , ग्रंथपाल गौरी देवळे उपस्थित होत्या.

यावेळी कवी नवनाथ रणखांबे, कवी मिलिंद जाधव,संघरत्न घनघाव, अक्षय भोईर, राजेश देवरूखकर, वसंत हिरे, प्रदीप बडदे, मनिषा मेश्राम, ज्योती गोळे ,सरू तोंडफोडे, अलका पराड, प्रतिभा केळवदे यांनी कविता सादर केल्या. एकूण ४० कवी सहभागी झाले असून सहभागी कवींना प्रमाणपत्र देउन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अमिता कुकडे, डॉ. परिघा विधाते यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.