शेतकरी -कष्टकरी संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा सरचिटणीसपदी दिपक दळवी

 

देवरूख:-अजित गवाणकर

शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या समस्या सोडविण्या साठी आणि न्याय हक्काच्या लढयासाठी सातत्याने झटणारे चाफवली गावचे प्रतिष्ठीत आंबा काजू बागायतदार श्री दिपक दळवी यांची शेतकरी -कष्टकरी संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती  अशोकराव जाधव संस्थापक अध्यक्ष शेतकरी -कष्टकरी संघटना यांनी केली आहे . 

दिपक दळवी यांना नियुक्ती देते वेळी महाराष्ट्राचे सरचिटणीस विश्वनाथ किल्लेदार , रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री ऊत्तम गायकवाड , संगमेश्वर तालुका अध्यक्ष अनंत धामणे इत्यादी शेतकरी कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी ऊपस्थित होते . दिपक दळवी यांचे नियुक्तीने रत्नागिरी जिल्हा शेतकरी -कष्टकरी संघटनेत चैत्यन्य निर्माण झाले असुन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास योग्य व्यक्ती नियुक्त केली गेली असल्याची चर्चा जनतेत आहे . आणि जनतेतून श्री दळवी यांचे अभिनंदन होत आहे .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.