मिरकरवाडा रत्नागिरीतील मुस्कान सोलकर युक्रेनमधून भारतात परत

रत्नागिरी :-
आज मिरकरवाडा रत्नागिरी येथील मुस्कान मन्सूर सोलकर ही विद्यार्थीनी भारतात दाखल झाली आहे. मुस्कान सोलकर ही विद्यार्थिनी मेडिकल एमबीबीएस च्या शिक्षणासाठी भारतातून शिक्षण घेण्यासाठी ह्याच वर्षी गेली होती. मुस्कान ला दिल्ली एअरपोर्टवर रिसिव्ह करण्यासाठी तिचे आई वडील व नातेवाईक दिल्लीला रत्नागिरीतुन गेले होते . 
मुस्कान सोलकर भारतात दिल्ली एअरपोर्टवर उतरल्यानंतर आपल्या आई वडील व नातेवाईकांना भेट करताना अश्रू आवरत नव्हते. आज रात्री मुस्कान आपल्या घरी मिरकरवाडा रत्नागिरीत दाखल होईल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.