जिल्ह्यात लोककलापथकांच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रसिध्दी मोहीम जोरात नागरिकांमधून होतेय उत्स्फूर्त स्वागत
रत्नागिरी: प्रतिनिधी
दि.12 शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्ताने शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कलापथकांच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत. या मोहिमेचा जिल्ह्यात 09 मार्च पासून प्रारंभ झाला आहे.
या मोहिमेमध्ये भाकर संस्था लांजा, आधार सेवा ट्रस्ट रत्नागिरी व शाहीर रत्नाकर महाकाळ लोककला मंच, खेड या संस्था लोककलेच्या माध्यमातून जागर करीत आहेत.
आज दापेाली तालुक्यातील गावतळे, फणसू, असोंड या गावांमध्ये तर चिपळूण तालुक्यातील चिपळूण बसस्थानक, चिपळूण बाजारपेठ, चिपळूण तहसिलदार कार्यालय, सावर्डे तसेच रत्नागिरी तालुक्यातील आठवडा बाजार, मारुती मंदिर, जयस्तंभ अशा विविध ठिकाणी कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे शासनाने गेल्या दोन वर्षात राबविलेल्या विविध योजनांची माहिती कलापथकाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या या लोकजागराचा नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.