कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह. बँकेकडून किरकोळ फळ भाजी विक्रेत्यांना कर्ज वाटप
इचलकरंजी : प्रतिनिधी
दि, १६ मार्च इचलकरंजी शहर व परिसरातील किरकोळ भाजीपाला फळे विक्रेत्यांना आर्थिक पाठबळ देणेसाठी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेने कर्जाच्या अनेक योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. वडगांव शेती उत्पन्न बाजार समिती, किरकोळ फेरीवाले संघटना. आण्णा रामगोंडा परिसर, शहापूर परिसर, स्वामी अपार्टमेंट या परिसरातील व्यापार्याना व फळ भाजी पाला विक्रेत्यांना रु. 1 कोटीचा कर्ज पुरवठा केलेला आहे.
इचलकरंजी परिसरातील अशा प्रकारच्या लहान-सहान व्यवसावास व व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी बँकेने कर्ज पुरवठा करून व्यावसायिकांची उन्नती करण्याचा मनोदच केलेला आहे. या सेवेचा फायदा इचलकरंजी शहरातील सर्वच लहान व्यापार्यांनी घ्यावा याकरिता वडगांव शेती उत्पन्न बाजार समिती येथील भाजी पाला विक्रेते तसेच किरकोळ फेरीवाले संघटना यांच्या वतीने किरकोळ फळांचा व्यापार करणारे फेरीवाले यांना कर्ज मंजूरीचे पत्र आणि उन्हापासून संरक्षण होण्याच्या उदात्त हेतूने बँकेच्या वतीने छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे तसेच वडगांव शेती उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच किरकोळ फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे यांनी, किरकोळ भाजीपाला आणि फळ विक्रेते यांच्या पाठीशी बैंक खंबीरपणे उभी असल्याचा विश्वास दिला. या घटकातील व्यापार्यांसाठी बँकेकडून अल्प दरात कर्ज पुरवठा करणेसाठी वडगांव शेती उत्पन्न बाजार समिती, किरकोळ फेरीवाले संघटना यांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करणेसाठी बँकमध्ये स्वतंत्र कक्ष कार्यान्वित केलेला असून या योजनेअंर्गत रु. 50,000 पासून रु. 1,00,000 पर्यंत प्राथमिक कर्ज मंजूरी देणेत येईल. या कर्जाची नियमित परतफेड केल्यानंतर सर्व व्यापार्यांना व्यवसायाच्या वृध्दीसाठी पुन्हा विनातारण वाढीव कर्ज वितरीत केले जाईल असे प्रतिपादन केले. या क्षेत्रातील इचलकरंजी परिसरातील सर्वच व्यापार्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपला व्यवसाय वृध्दिंगत करावा असे आवाहन करणेत आले.
सदर प्रसंगी वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी बँकेने हाती घेतलेल्या या योजनेचे अत्यंत भावनापूर्ण शब्दात प्रकटीकरण करून, रस्त्यावर बसून किरकोळ भाजीपाला विक्री करणार्या भाजी पाला विक्रेत्यांना आर्थिक गरजा भागविण्यासाठी बँकेने मोलाचे कार्य केले असल्याचे मानोगत व्यक्त केले.
फेरीवाले किरकोळ फळे विक्रेते संघटनेचे अध्यक्ष श्री शफीक बागवान यांनी फेरीवाले फळ विक्रेत्यांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी बँकेने चालू केलेल्या या योजनेचे स्वागत केले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विजय कामत यांनी बँकेच्या विविध कर्जाच्या योजनांची माहिती देवून, बँक पूर्वीपासूनच सर्वसामान्य घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सूतोवाच केले.
सदर प्रसंगी वडगांव शेती उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष श्री जगोंडा पाटील, संचालक श्री सागर मुसळे, नगरसेवक श्री संजय केंगार, उद्योजक श्रेणिक मगदूम, प्रदीप दरिबे, समीर मुल्ला, कल्याण सुरवसे, सचिन हेरवाई, राजू कोरे, श्रीकांत टेके, बँकेचे संचालक श्री शैलेश गोरे, अविनाश कांबळे, बंडोपंत लाड, महेश सातपुते, सुभाष जाधव, बँकेचे जनरल मॅनेजर किरण पाटील व दिपक पाटील, मॅनेजर श्री राजेंद्र शिरगुरे भागातील नागरीक व व्यापारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.