आपत्तीकालीन व्यवस्थापनाचे शिक्षण – काळाची गरज

डी.के.ए.एस.सी.कॉलेजमध्ये N.C.C. विभागाची कार्यशाळा संपन्न

इचलकरंजी  -प्रतिनिधी

येथील डी. के. ए.एस.सी.महाविद्यालयाच्या N.C.C .विभागाच्यावतीने अग्रणी महाविद्यालययोजने अंतर्गत  ‘आपतकालीन व्यवस्थापन’ (Disaster management) या विषयावर कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत मा.श्री .संजय कांबळे सर यांनी यांनी व्याख्यान देऊन , प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले.
मा.श्री .संजय कांबळे सर कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना म्हणाले ,आपत्तीकालन व्यवस्थापनाचे शिक्षण काळाची गरज आहे,आपत्तीपूर्व  आणि आपत्ती काळात घेतली जाणारी काळजी व व्यवस्थापन कसे करावे यांचे अतिशय उत्तम मार्गदर्शन त्यांनी केले.आज प्रत्येकाने हे प्रशिक्षण घेतले पाहिजे असे सर म्हणाले .
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा.श्री .रूपेश खरवार आणि मा.श्री .संजय झुटाळ सर म्हणून उपस्थित होते,त्यांनीही प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे होते. पाहुण्यांचा परिचय N.C.C.विभागप्रमुख व समन्वयक मेजर मोहन वीरकर सर यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.पी.के.वाघमारे मँडम यांनी केले. आभार डॉ.मधुमती शिंदे यांनी मानले.तर सुञसंचालन कु.सुप्रिया उळे हिने केले
या कार्यक्रमासाठी इ.न.पा.चे श्री .तुषार हेगडे,श्री .सुकुमार उंदूरे,श्री .अनिल पवार व श्री .दशरथ जाधव इत्यादींनी प्रात्यक्षिक सादरीकरणात सहभाग नोंदविला.या कार्यशाळेत क्लस्टर कॉलेज अंतर्गत विविध महाविद्यालयातील  ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. महाविद्यालयातील प्राध्यापक मुजफ्फर लगिवाले,  प्रा. यादव, डॉ. इंगळे, डॉ. गावडे, डॉ.वेल्हाळ  इत्यादी शिक्षक उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.