इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १८ एप्रिल येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेच्या महिला बचत गटाच्या समन्वयक कु. नजमा गुलाब शेख यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने ‘गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा 19 एप्रिल रोजी मुंबई येथे संपन्न होत आहे.
नजमा शेख या मागील 15 वर्षापासून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेत महिला बचत गटाच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे व माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. महिलांनी स्वावलंबी बनून स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याद्वारे आजवर तब्बल 1800 बचत गट बँकेशी जोडले गेले आहेत. आवाडे जनता बँकेच्या माध्यमातून विविध उद्योग-व्यवसायांसाठी कर्जपुरवठा करुन त्यांना उद्योजिका बनविले जात आहेत. यामध्ये नजमा शेख यांनी समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहेत. यामध्ये त्यांना संचालक स्वप्निल आवाडे, माजी सीईओ विजय कामत तसेच विद्यमान सीईओ संजय शिरगांवे यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. शेख यांच्या या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने त्यांची गुणवंत कामगार कल्यार पुरस्कारासाठी निवड केली आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.