मुख्याध्यापक निसार कनवाडे व शिक्षकांनी केला मा. शिक्षण सभापती राजू बोंद्रे यांचा यथोचित सत्कार

इचलकरंजी : संजय आंबे

दि. १५ जुलै :सभापती आपल्या दारी उपक्रम, आवश्यक त्याठिकाणी शिक्षक भरती आदींच्या माध्यमातून शाळांचा पट वाढविण्यासाठी तत्कालीन शिक्षण समिती सभापती राजू बोंद्रे यांनी केलेल्या प्रयत्नातून  सरहद्द गांधी खान अब्दुलगफार खान न.पा. शाळा क्र. 46 या शाळेतील पटसंख्या वाढली. त्याचबरोबर शाळेतील रिक्त मुख्याध्यापकपदी कायमस्वरुपी नियुक्ती दिल्याबद्दल शाळेच्यावतीने मुख्याध्यापक निसार कनवाडे व शिक्षकांनी राजू बोंद्रे यांचा यथोचित सत्कार केला.
इचलकरंजी महानगरपालिका होण्यापूर्वी कार्यरत नगरपरिषदेत राजू बोंद्रे हे शिक्षण समितीचे सभापती होते. नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांची परिस्थिती व शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी श्री. बोंद्रे यांनी आपल्या कार्यकाळात सभापती आपल्या दारी हा उपक्रम राबविला. त्या अंतर्गत ते शिक्षकांसमवेत सर्वसामान्यांच्या घरोघरी जावून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत आवाहन करत होते. परिणामी सरहद्द गांधी खान अब्दुलगफार खान न.पा. शाळा क्र. 46 मध्ये पूर्वी असलेल्या 130 या पटसंख्येत भर पडली आणि ती 207 इतकी झाली. शिवाय या शाळेत कायमस्वरुपी मुख्याध्यापकाची गरज ओळखून पाठपुरावा करत श्री. बोंद्रे यांनी निसार कनवाडे यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. आपल्या कार्यकाळात सातत्याने प्रयत्नशील राहून पटसंख्या वाढीसह  शिक्षणाचा दर्जाही उंचावण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांच्या यशाबद्दल मुख्याध्यापक निसार कनवाडे व शिक्षकांनी राजू बोंद्रे यांची भेट घेत सत्कार केला.
मिळालेल्या संधीच्या माध्यमातून आपण शाळांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. शाळांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला. तसेच आवश्यक कामांसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. कोरोना संकटामुळे केवळ दोन महिनेच काम करण्याची संधी मिळाली. तर पुनश्‍च संधी मिळाली असती तर संपूर्ण 38 शाळांचा कायापालट करुन दाखविला असता असा विश्‍वास राजू बोंद्रे यांनी यावेळी व्यक्त केला. ज्या ज्या शाळांचा पट वाढेल त्या सर्व शाळांच्या 8 वी पुढील वर्गवाढी संदर्भातही शासन दरबारी पाठपुरावा सुरु असून भविष्यात महानगरपालिका शाळांसाठी जे करता येईल त्यासाठी प्रयनशील राहू, असेही ते म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.