दंडोबा डोंगरावर जैन मंदिर परिसरात वृक्षारोपण
जयसिंगपूर : विजय घंगेकर
दि. 17 ऑगस्ट :स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पुण्यतिथी निमित्त दंडोबा (जि. सांगली) डोंगरावरील जैन मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. हे जैन मंदीर अनेक वर्षापासून दुर्लक्षीत होते. गेल्या महिन्यात युवकांनी पुढाकार घेवून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे. प्रत्येक रविवारी मंदिर परिसर स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण उपक्रम प्रत्येक रविवारी चालू आहे. या समाजकार्यातून गावागावातून युवकांनी सहभाग घेतला आहे.
या रविवारी देशाता अमृतमहोत्सव व वीराचार्य कुचनुरे यांच्या पुण्यतीथीनिमित 250 पेक्षा अधिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये 130 पेक्षा अधिक युवक, जेष्ठ मान्यवरांनी सहभाग घेतला. कोणत्याही संस्थेच्या माध्यमातून हे काम न करता केवळ पर्यावरण आणि संस्कृती रक्षणार्थ स्वेच्छेने चालू असलेल्या उपक्रमात सांगली जिल्ह्यातील वन विभाग अधिकारी युवराज पाटील आणि त्यांचे सहकारी कर्मचारी, मिरज पंचायत समितीचे सदस्य काकासाहेब धामणे, मालगाव ग्रामपंचायतचे सदस्य शशिकांत कनवाडे, दिगंबर आवटी सहभागी झाले होते. वृक्षारोपण उपक्रमासाठी महावीर देसाई, राजकुमार चिंचवाडे, स्मिता शहा, राजकुमार केरीमाने आणि शरद कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर यांनी वृक्षदान केले.
या उपक्रमासाठी शरद शिक्षण संकुलाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात चंदा बाबा सायकल ग्रुप, वीर सेवा दल मालगांव, जैन बोर्डिंग-सांगली आणि सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील श्रावकांनी श्रमदान केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.