मुंबई विद्यापीठ ५५ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात रांगोळी ठरली लक्षवेधी
मुंबई:
मुंबई विद्यापीठाचा ५५ व्या आंतरमहाविद्यालयीन/संस्थात्मक/विभागीय युवा महोत्सवाचा प्रारंभ मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर, २०२२ रोजी श्री. भगत सिंह कोश्यारी, मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य व कुलपती, महाराष्ट्र राज्य विद्यापीठे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी लोकप्रिय अभिनेते श्री. मा.अशोक सराफ, प्रा. (डॉ) दिगंबर शिर्के, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, प्रा. (डॉ.) शैलेंद्र देवळाणकर, प्रभारी कुलसचिव, मुंबई विद्यापीठ यांच्यासह सौ. निवेदिता सराफ, विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ. सुनील पाटील, सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व मुंबई विद्यापीठाचा राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सव स्पर्धेतील पदकप्राप्त कलाकार श्री. विलास विजय राहटे यांनी मा. श्री. भगत सिंह कोश्यारी व मा. श्री. अशोक सराफ यांची राजाबाई टॉवर, फोर्ट, मुंबई येथील हॉलमध्ये साकारलेली रांगोळी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली.
श्री विलास रहाटे यांनी यापूर्वी मुंबई विध महत्त्वपूर्ण कार्यक्रमात अनेक वेळा विवि विषयांवर रांगोळी साकारून नावलौकिक मिळवला आहे. मुंबई विद्यापीठाच्या या गुणी कलावंताने छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात छोटी रांगोळी साकारून यापूर्वी जागतिक विक्रम केलेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये श्. विलास रहाटे यांच्या रांगोळी कलेचा गौरव महाराष्ट्राचे मा. राज्यपाल श्री.भगत सिंग कोश्यारी व श्री अशोक सराफ यांनी सन्मानचिन्ह देऊन केला.
श्री. विलास रहाटे यांच्या मा. राज्यपालांच्या हस्ते झालेल्या सन्मानाबद्दल संस्थाध्यक्ष श्री. सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, कला मार्गदर्शक लक्ष्मीकांत साळसकर, प्रा. संदीप पवार, डॉ. वर्षा फाटक, प्रा. धनंजय दळवी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.