ए एस सी महाविद्यालयाचे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश

इचलकरंजी :विजय मकोटे 

दि १ :दिनांक 28 ते 31 जानेवारी 2023 रोजी पुणे बालेवाडी येथे झालेल्या शासकीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये दत्ताजीराव कदम एएससी महाविद्यालयातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. 19 वर्षाखालील उंच उडी या स्पर्धेमध्ये समीक्षा अडसुळे 1.50 मीटर उंच उडी मारून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला त्याच पद्धतीने सतरा वर्षाखालील उंच उडी मध्ये प्रतीक्षा अडसुळे 1.43 मीटर उंच उडी मारून प्रथम क्रमांक मिळविला सौरभ दंडवते याने 45.92 मीटर हॅमर थ्रो फेकून द्वितीय क्रमांक मिळविला तसेच पुष्कर माळी याने थाळी फेक मध्ये 41.30 मीटर थाळी फेकून द्वितीय क्रमांक मिळवला त्याच पद्धतीने पालघर येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये प्रथमेश खुळे याने 44 किलो वजन गटांमध्ये तृतीय क्रमांक मिळवला या सर्व खेळाडूंची नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी आणि महाविद्यालयाची सर्व विद्यार्थी यांनी या सर्व खेळाडूंचे कौतुक केले या खेळाडूंना माननीय प्राचार्य डॉ अनिल पाटील सर यांच्या हस्ते ट्रॅक सूट व सर्टिफिकेट वितरण करून त्यांचे कौतुक केले प्रत्येक मुलाला एक ट्रॅक सूट महाविद्यालयाकडून देण्यात आला सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले.

या खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय प्राचार्य अभय कुमार साळुंखे सेक्रेटरी प्राचार्य डॉ शुभांगी शुभांगी गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले या खेळाडूंना प्रा मेजर मोहन वीरकर प्रा मुजफ्फर लगीवाले प्रा प्रशांत कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.