डिकेटीई च्या २० विद्यार्थ्यांची ए.जी.लाईड या नामांकित कंपनीत निवड

इचलकरंजी.विजय मकोटे

ता. २३ मे ः डीकेटीईच्या तब्बल २० विद्यार्थ्यांची ए.जी. लाईड, पुणे या नामांकित कंपनीत ५ लाखाच्या उत्तम पॅकेजवरती निवड करण्यात आलेली आहे. ए.जी.लाईड कंपनीच्या वतीने डीकेटीईमध्ये झालेल्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये २० निवड करण्यात आली आहे. या कॅम्पस इंटरव्हयूकरीता एकूण तीन फे-या घेण्यात आल्या.  ऍप्टीटयुट, टेक्निकल आणि एच.आर. राउंड या सर्व फे-यांमध्ये डीकेटीच्याच्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे आपली गुणवत्ता सिद्ध केली.
आय.टी. क्षेत्रात अग्रगण्य अशी ए.जी.लाईड ही कंपनी दूरसंचार, ऍटोमेटीव्ह, इलेक्ट्रॉनिक्स व संलग्न उदयोगधंदयाशी निगडीत आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. जगभरात अनेक देशामध्ये कंपनीचे कॉर्पोरेट ऑफीस आहेत.
कंपन्याना लागणारे उत्तम तंत्रज्ञ तयार करता यावेत यासाठी या विद्यार्थ्यांना डीकेटीईमध्ये खास सॉफट स्कीलचे वेगळे तास आयोजित करुन त्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. डीकेटीईमध्ये इंटरव्हयूच्या तयारीसाठी प्रत्येक विभागामध्ये खास प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. डीकेटीई संस्थेने आपल्या उत्तम शैक्षणिक दर्जाच्या बळावर विद्यार्थ्यांना क्वालीटी प्लेसमेंट गेली कित्येक वर्षे सातत्याने उपलब्ध करुन देत आहे. सध्या इंजिनिअरींग क्षेत्रात जोरदार स्पर्धा असल्याकारणाने हे यश मोठे मानले जाते आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नांवे – कल्पना बाळीघाटे, शुभम जोशी, प्रतिक्षा परिट, आयेशा सनदी, रचित कुलकर्णी, सचिन साळुंखे, प्रेरणा राठी, स्वलेहा मुल्लाणी, दिक्षांत खूळ, सेजल आमने, सुयोग पाटील, गजश्री टेके, पृथ्वीराज पाटील, श्रध्दा पाटील, श्रेयांश तेरदाळे, प्रचिती सुर्यंवंशी, आरती गुरव, साक्षी रोकडे, नेहा यादव व प्रेरणा गजवाणी.
विद्यार्थ्यांच्या या सुयशाबद्दल संस्थेचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे व उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सौ. सपना आवाडे, सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्रभारी डायरेक्टर प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ. डी.व्ही. कोदवडे, डॉ. एस.ए. पाटील, डॉ. आर. एन. पाटील व टीपीओ प्रा.जी.एस. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.