पुणे:प्रतिनिधि
दि:१७:जून:शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील वारेज परिसरात एका 21 वर्षीय तरूणावर गोळीबार करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या अशाप्रकारे गोळीबार करण्यात आल्याने नागगरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज हा वारजेतील जय भवानी चौकातून जात होता. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी सुरजवर बेछूट गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर बंदुकीतून तीन राऊंड फायर केल्याचे पोलिसांनी सांगितले. यात सुरज जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्यात दिवसाढवळ्या अशाप्रकारे गोळीबार झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. सुरजवर गोळीबार कुणी आणि का केला याबाबत कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नसून, पुढील तपास पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसून येत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्यांवर पोलिसांचा वचक राहिला आहे का? असा प्रश्न आजच्या घटनेवरून पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे
वारजेत घडलेली गोळीबारीची ही घटना आज शनिवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली असून, भर दुपारी वारजे माळवाडी परिसरात तरूणावर गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.