डीकेटीई म्हणजे उज्वल करिअर

डॉ सपना आवाडे यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना स्वागत समारंभात दिला कानमंत्र

इचलकरंजी:प्रतिनिधी 

दि १८ ऑगस्टˆ- जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक प्रतिभाशाली अभियंत्यांची गरज आहे आणि असे सक्षम व गुणवत्तापूर्ण अभियंता बनिण्याचे सामर्थ्य डीकटीईमध्येच आहे असे प्रतिपादन डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सौ. सपना आवाडे यांनी प्रथम वर्ष बी.टेक. टेक्स्टाईल व इंजिनिअरींग, डिप्लोमा व एमबीए विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात केले. संस्थेचा प्रगतीचा आढावा घेत असताना त्या म्हणाल्या की, डीकेटीईचे जगभर पसरलेले विद्यार्थी डीकेटीईचे नाव उज्वल करीत आहेत. त्यामुळे डीकेटीई हा ब्रँड जगाच्या पाठीवर अधोरेखीत झाला आहे.
घोरपडे नाटयगृह, इचलकरंजी येथे संपन्न झालेल्या या समारंभात डॉ. सपना आवाडे यांनी, डीकेटीई इन्स्टिटयूट ही जगभरात आदर्शवत इन्स्टिटयूट म्हणून ओळखली जाते असे सांगत विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तम करिअरसाठी अनेक मंत्र सांगितले जसे की, वाईट संगत, वाईट सवयी, सोशल मेडियाचा अवास्तव वापर टाळा, निष्काळजीपणा,पालकांची जागरूकता तसेच इंजिनिअरींग शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी देशहीत तसेच सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा, नियमित व्यायाम व नियमित वाचनाचा सराव करावा असे अनेक मोलाचे कानमंत्र डॉ सौ. सपना आवाडे यांनी नवीन विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दिले. डीकेटीईतील गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञान अवगत करुन अभियांत्रिकी शिक्षणातील यश संपन्न करावे व विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाने डीकेटीईचा असाच नावलौकीक वाढवावा असे सांगून त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने झाली. प्रा.सौ.एस.ए. पाटील यांनी ‘सॉग ऑफ युथ‘ हे सर्वाना सांगितले. प्र.संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे यांनी प्रास्ताविक आणि स्वागतात विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानांच जगभरातील विविध देशातील विद्यापीठे आणि शिक्षण संस्थातील सामंजस्य करारामुळे क्रेडिट ट्रान्स्फर स्कीम व पदव्युत्तर शिक्षण मोठया शिष्यवृत्तीसह घेण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळत असत याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे अवाहन केले. प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ ए.के.घाटगे यांनी विद्यार्थ्यांनी प्राध्यपकांशी समन्वय साधत आपले अभ्यासक्रमातील अधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्याविषयी मार्गदर्शन केले. डे.डायरेक्टर प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय यशाबददल माहिती सांगितली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये प्रा.डॉ जे.एम.पाटील यांनी गतवर्षी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे उल्लेखली. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणा-या, प्लेसमेंट झालेल्या व परदेशात एम.एस. अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मानद सचिव डॉ सौ. सपना आवाडे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रा.जे.आर.नागला यांनी आभार मानले. सुत्रसंचालन प्रा. एस.जी. कानिटकर यांनी केले.वंदे मातरम प्रा. एस.एस.उदगांवे यांनी गायले. कार्यक्रमास सर्व डीन्स, सर्व विभागप्रमुख, टेक्स्टाईल व इंजिनिअरींग टीपीओ, रजिस्ट्रार, हॉस्टेल विभागप्रमुख अदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजमधील सर्व विभागाची ओळख करुन देण्यात आली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.