चेतन मोटर्स इचलकरंजी येथे टाटा एस इलेक्ट्रिक या अत्याधुनिक कमर्शियल व्हेईकलचा अनावरण सोहळा उत्साहात

कब नूर ,दि ३१ : चेतन मोटर्स ,कबनूर- इचलकरंजी येथे टाटा एस इलेक्ट्रिक या अत्याधुनिक कमर्शियल व्हेईकलचा अनावरण सोहळा उत्साहात पार पाडला .या अनावरण सोहळ्यासाठी इचलकरंजी चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थीत होते .

कमर्शियल प्रकारातील भारतातील हे पहिलंच फोर व्हिलर इलेक्ट्रिक वाहन आहे.हे वाहन छोटा हत्ती म्हणूनही ओळखलं जातं.नवीन इलेक्ट्रिक वाहनात 21.3 kwh ची बॅटरी बसवण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये 154 किमी अंतर टाटा एस पार करते. टाटा मोटर्सच्या चार्जिंग पॉइंटवर टाटा एस 105 मिनिटांत संपूर्ण चार्जिंग होते, तर घरच्या घरी पूर्ण चार्ज होण्यासाठी टाटा एसला 7 तास लागतात.  टाटा एस इव्हीच्या बॅटरीवर पाणी, धूळ, चिखल याचा कोणताही परिणाम होत नाही, जेणेकरून कोणत्याही हवामानात ही गाडी वापरणे सोयीचं आहे.टाटा मोटर्सने टाटा एस इव्ही डिलिव्हरी व्हॅनच्या रुपात बनवली आहे.यामध्ये 600 किलो पर्यंत माल वाहतूक करण्याची क्षमता आहे.नवीन टाटा एस इव्ही ही सर्वार्थाने छोट्या वाहतूक व्यावसायिकांच्या फायद्याची आहे. व्यावसायिक बंधूंनी चेतन मोटर्सच्या  येथील शोरूमला भेट देऊन टाटा एस इव्हीची टेस्ट ड्राइव्ह घ्यावी व बुकींग करावे. बुकींग करणाऱ्यांना आकर्षक व्याजदरात फायनान्स पण उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी दिली आहे.


यावेळी चेतन मोटर्सचे टीएसएम प्रवीण असबे, चेतन मोटर्स कोल्हापूरचे सेल्स हेड सलीम हुदली, चेतन मोटर्स इचलकरंजीचे सेल्स मॅनेजर विश्वास पाटील, अमीर जमादार किशोर बिडकर,इत्यादी उपस्थित होते .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.