म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली पाहणी

सांगली:प्रतिनिधी 

दि. 2: म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत कार्यकारी अभियंता रोहित कोरे व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मौजे आरग हद्दीतील जोड प्रवाही नलिका येथे नलिका अंथरणेचे कामाची पाहणी करून कामांची तांत्रिक माहिती घेतली. तसेच योजनेच्या कामास असणाऱ्या क्षेत्रीय अडचणींची माहिती घेऊन त्या दूर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी वन विभागाच्या जमिनीतून जाणाऱ्या नलिकांसाठी  सादर केलेल्या प्रस्तावावर  तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना उपवनसंरक्षक यांना केल्या. तसेच शेत जमिनीमधून जाणाऱ्या नलिकांसाठी कृषी विभागाकडून मूल्यांकन प्राप्त करून पीक नुकसान भरपाईचे प्रस्ताव सक्षमस्तरावर मान्यतेसाठी पाठवावेत असेही त्यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.