शबाना नेवरेकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती
शबाना नेवरेकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती
कडवई:27/02/24
जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. या यादीत अंत्रवली गावातील सामाजिक कार्यकर्त्या आणि आमदार शेखर निकम यांच्या खंद्या समर्थक शबाना लियाकत नेवरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शबाना नेवरेकर ह्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर

आहेत.नेवरेकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत आमदार शेखर निकम यांच्या शिफारशीनुसार त्यांच्या खांद्यावर विशेष कार्यकारी अधिकारीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ही नियुक्ती मिळाल्यानंतर नागरिकांच्या सेवेसाठी आपण २४ तास हजर राहू, असे नेवरेकर यांनी सांगितले. मिळालेले पद हे जनतेच्या सेवेसाठी असून, या पदाच्या माध्यमातून जनतेची सेवाच करू असे त्या म्हणाल्या.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.