कडवई- विकास नगर कडे जाणारा रस्त्याजवळील नदीवर संरक्षण भिंतीची गरज, दुर्घटना घडण्याची शक्यता
कडवई- विकास नगर कडे जाणारा रस्त्याजवळील नदीवर संरक्षण भिंतीची गरज, दुर्घटना घडण्याची शक्यता
कडवई :
कडवई- विकास नगर कडे जाणारा रस्त्याजवळील नदीवर संरक्षण भिंत नसल्याने या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे.

कडवई-तिठा ते धरण- विकास नगर कडे जाणारा रस्त्याजवळील नदीवर संरक्षण भिंत नसल्याने याठिकाणी दरवर्षी झालेल्या पावसामुळे रस्त्याकडील काहीसा भाग ढासळला आहे. रस्ता आणि नदीचे पात्र जवळपास एकच असल्याने याठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते.या रस्त्याचे काम आताच झाले आहे आणि अवकाळी पावसामुळे रस्ता व नदीचे पात्र अंतर नाही आहे.धरण भरल्यानंतर या नदीला पाण्याचे प्रवाह जास्त असते. अशावेळी दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.भविष्यात याठिकाणी संबंधित विभागाने फेरसर्व्हेक्षण करुन संरक्षण भिंत बांधावी. वेळीच याठिकाणी उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भिती ग्रामस्थांनी वर्तवली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.