मनोज साळुंखे फाऊंडेशनच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी
दि .१९ :येथील मनोज साळुंखे फाऊंडेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
इचलकरंजी नगरपरिषदेतील माजी शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे यांच्या माध्यमातून फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाही जन्मोत्सवाचे औचित्य साधत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमास शिवाजी शिंदे, शरद सुखटणकर, सचिन खोंद्रे, सदा कोरवी, लक्ष्मण कबनुरे, कृष्णा हक्कतंगीरहाळ,चांद जमादार, सतीश पाटील, रवींद्र भांडे, धनंजय दाहोत्रे, निलेश पाटील, आकाश वासुदेव, सलीम नदाफ, संदीप गवड, कुमार शिंदे, अमन शिरगावे आदींसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.