माध्यमिक विद्यालय कुंभारखानी बुद्रुक हायस्कूल दहावीचा १०० टक्के निकाल
माध्यमिक विद्यालय कुंभारखानी बुद्रुक हायस्कूल दहावीचा १०० टक्के निकाल
आरवली:(सचिन पाटोळे)
संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखानी बुद्रुक येथील मौजे कुंभारखानी बुद्रुक ग्रामोत्कर्ष संघ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कुंभारखानी विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून कुमारी धनश्री सिताराम सावर्डेकर ९१.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

द्वितीय क्रमांक कुमारी वेदीका विनायक सुर्वे ८८.२० टक्के व तृतीय क्रमांक कुमार प्रणव विशाल नाचरे याने ८६.६० टक्के गुण मिळवले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे कुंभारखानी शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.