संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये विशेष करिअर मार्गदर्शन शिबाराचे आयोजन

कोल्हापूर :प्रतिनिधी 

दि .१० महाराष्ट्र राज्य आभियांत्रिकी डिप्लोमा, बी.ई. आणि बी. टेक इंजिनिअरिंग, आयटीआय,शासन मान्य अल्प मुदतीचे अभ्यसक्रम प्रवेश प्रकिया २०२४-२०२५ सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी अंतर्गत प्रथम वर्ष आभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कॅप राऊंड-१ साठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा, विविध शासकीय शिष्यवृत्ती योजना,  करिअरची योग्य दिशा या विषयावर इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी  विशेष करिअर मार्गदर्शन शिबाराचे आयोजन गुरुवार दिनांक १३  जून  २०२४  रोजी सकाळी  ठीक. ११:०० वा. सेमिनार हॉल दुसरा मजला सी ब्लॉक संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे   कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. या मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व पालकांना संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट व्ही. गिरी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

इंजिनिअरिंग प्रवेशाच्या या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये: मेरिट लिस्ट विश्लेषण, शीट डिस्ट्रीब्यूशन मॅट्रिक्स, स्टेप इन फिलिंग ऑप्शन फॉर्म व स्टेट एक्सेप्टेशनस रुल्स:  या प्रवेशासंदर्भातील महत्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.  इंजिनिअरिंग चे फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे देखील या मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून शेवटी दिली जाणार आहेत.
संजय घोडावत इन्स्टिट्यूटला, ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) नवी दिल्ली यांनी पदवी इंजिनिअरिंगच्या अभ्यसक्रमास मान्यता मिळालेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ पासून संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये पदविका अभियांत्रिकी सोबतच पदवी अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विषेश करून यामध्ये  मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग,  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आयटीआय: इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स  मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, अल्पमुदतीचे अभ्यासक्रम: डिप्लोमा इन ड्रेस डिझाईनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग, ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी, डिप्लोमा इन फोटोग्राफी अँड फोटोग्राफी शाखा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
संजय घोडावत इन्स्टिट्यूट डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ, लोणेरे यांच्या सोबत संलग्न असून शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून पदविका सोबत पदवी अभ्यासक्रमासाठी  केंद्रीय प्रवेश प्रक्रियानुसार येथे प्रवेश देण्यात येणार असून, यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सर्व शासकीय शिष्यवृत्ती देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहेत, इथून पुढे संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून आम्ही समाजातील प्रत्येक घटकांना उत्कृष्ट,दर्जेदार शिक्षण आणि तेही माफक फी मध्ये आमच्या जागतिक दर्जाच्या संकुलनात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत.
या मार्गदर्शन कार्यक्रमात इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या ग्रामीण व शहरी  भागातील सर्व  विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजय घोडावत इन्स्टिट्यूट मार्फत आपणा सर्वांना करण्यात येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.