Browsing Category

शासकीय

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय

मुंबई : प्रतिनिधी दि. 13 : राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव…

गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले स्व. आनंद दिघे यांना अभिवादन

ठाणे : प्रतिनिधी दि.13  : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करीत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय जेणेकरून सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडून…

महाराष्ट्रासाठीची मतपेटी स्वीकारुन अधिकाऱ्यांचे पथक मुंबईकडे रवाना

मुंबई : प्रतिनिधी दि. १२ : भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठी मतपेटी व इतर साहित्यांचे नवी दिल्ली येथील निर्वाचन सदन येथे वाटप सुरु केले आहे. महाराष्ट्रासाठीची मतपेटी व इतर साहित्य राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर…

प्रादेशिक मनोरुग्णालय येथे आधार नोंदणी शिबीर

रत्नागिरी : अस्लम खान दि.१२ जुलै:- जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी व प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने १२ व १३ जुलै २०२२ रोजी मनोरुग्णांचे आधार कार्ड काढणेसाठी विशेष शिबिराचे आयोजन करणेत आले आहे. या…

जिल्ह्यात एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. 5 जुलै: संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफच्या 2 तुकड्या दाखल झाल्या. एक तुकडी शिरोळकडे रवाना झाली असून दुसरी तुकडी मंगळवारी…

समाज कल्याण कार्यालयामध्ये गौरी पोवार ‘कार्यालयीन सहाय्यक’ पदावर रुजू

कोल्हापूर : प्रतिनिधी  दि. ३ जुलै : तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच आर्थिक सक्षम बनविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांच्या पुढाकाराने जिल्हयात विविध उपक्रम घेण्यात येत आहेत.…

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी  दि, 1 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार…

राजधानीत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

नवी दिल्ली : प्रतिनिधी दि 1 : हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.             कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील…

बालमजुरी प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक

मुंबई,: प्रतिनिधी दि. 20 जून: बालमजूरीमुळे लहान मुलांचे निरागस बालपण हरवते. शिक्षण घेण्याच्या वयात एकाही मुलावर मजुरीची वेळ येऊ नये. बालमजुरी प्रथेचे महाराष्ट्रातून समूळ उच्चाटन करून  “बाल मजूर मुक्त महाराष्ट्र” साठी स्वयंसेवी…

खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी क्रीडा सुविधा गतीने उपलब्ध करुन द्या

कोल्हापूर : प्रतिनिधी  दि. १८ जून: जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे, यासाठी जिल्ह्यातील खेळाडूंना क्रीडा सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.   जिल्हाधिकारी राहुल…